सर्वसामान्यांवर होणारे अन्याय वेळीच रोखा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल –प्रा.टी.पी.मुंडे (सर)

देश-विदेश
Spread the love

सर्वसामान्यांवर होणारे अन्याय वेळीच रोखा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल –प्रा.टी.पी.मुंडे (सर)

प्रा.टी.पी.मुंडे यांनी घेतली पत्रकार संभाजी मुंडे आणि कुटूंबीयांची भेट

परळी । प्रतिनिधी
परळीत आणि तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था अजिबात शिल्लक राहिली नसून दादागिरी मोठ्या प्रमाणावर अवाढली आहे. प्रशासनाचा गुंडांवरील वचक संपला की काय? असा सवाल निर्माण झाला आहे. मागील काही काळात परळीत अनेक हल्ले झाले आहेत. ज्यामध्ये दोन वेळा पत्रकारांवर हल्ले झाले. त्यामुळे प्रशासनाने सर्वसामान्यांवरील अन्याय वेळीच रोखावेत अन्यथा आपल्याला स्वत:लाच रस्त्यावर उतरावे लागेल असा ईशारा लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी दिला आहे.
सर्वसामान्य नागरीकांवर होणारे हल्ले आणि अन्याय अत्याचार पाहता कायदा सर्वांसाठी आहे का? असा प्रश्न लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी विचारला आहे. आज दि.११ जुन रोजी त्यांनी पत्रकार संभाजी मुंडे यांची आणि त्यांच्या कुटूंबीयांची घरी जावून भेट घेतली व तब्येतीची विचारपुस करून सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत युवा नेते तथा कृऊबाचे उपसभापती प्रा.विजय मुंडे, रविंद्र (पापा) गित्त्त्ते आदींची उपस्थिती होती. हल्ल्याने घाबरलेले पत्रकारांच्या कुटूंबीयांना धिर देत आपण कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्यांच्या सोबत आहोत असे आश्वासन त्यांनी दिले. यापुढे परळीतील सर्वसामन्यांवरील अन्याय प्रशासनाने रोखावेत व गुंडगिरी आणि दादागिरीला आळा घालावा अन्यथा आपण नाईलाजाने रस्त्यावर उतरू असा ईशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *