सामाजिक न्यायमंञी ना.धनंजय मुंडेसह मुंबईतील बंगल्यातील काही व्यक्ती कोरोनाबाधित

मुंबई
Spread the love

सामाजिक न्यायमंञी ना.धनंजय मुंडेसह मुंबईतील बंगल्यातील काही व्यक्ती कोरोनाबाधित

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह  अन्य  कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.

याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली.

ना राज्याचे सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांच्या स्वीय सहायकासदेखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते. परळीत जगतकर गल्लीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह औरंगाबाद येथे 5 जुन रोजी आढळुन आली होती. त्यावेळी तिच्या कुंटूबीयांच्या संपर्कात ना.धनंजय मुंडे देखील आले होते. मात्र मुंडे यांचा समावेश हायरिस्क गटात न करता लो रिक्स गटात करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले नव्हते. तर हायरिस्क गटातील लोकांचे स्वॅब निगेटिव्ह आढळुन आले हेते. त्यानंतर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणु निदान प्रयोग शाळेचे उद्घाटन देखील केले होते. आता मुंडे यांना करोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु या प्रयोग शाळेच्या उद्घाटनाला अनेकजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *