बी बियाणे उगवत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे अर्ज करावेत वसंत मुंडे

बीड
Spread the love

बी बियाणे उगवत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे अर्ज करावेत वसंत मुंडे

परळी-वैद्यनाथ (प्रतिनिधी) निसर्गाच्या कृपेमुळे पेरणीसाठी चांगला पाऊस पडला आहे त्यामुळे बाजारपेठेत खत बी बियाणे औषधी शेतकरी खरेदी करीत आहे व स्वतःच्या शेतात जाऊन पेरणी चालू केली आहे परंतु बी बियाणे उगवत नाहीत यास शासन कृषी विभागाचे धोरण जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी केला आहे अगोदरच शेतकरी विविध संकटाला हतबल झालेला असून अतिवृष्टी अवकाळी पाऊस दुष्काळ कोरोना बाजारपेठेतील पडलेले भाव कठिण प्रसंगाला शेतकरी तोंड देत आहे बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणावर खते बी-बियाणे औषधी बोगस आलेले आहेत माझ्या स्वतःच्या शेतात ग्रीन गोल्ड सोयाबीन 30 44 चे बी उगवले नाही महाराष्ट्र शासनाकडे दि 13 /2 /2019 ला शासनाकडे खते बी-बियाणे औषधी त्यासंदर्भात विविध मुद्यांसह तक्रार दाखल केलेले आहे कंपनी डीलर्स अधिकारी यांच्या संगनमताने महाराष्ट्रात कृषी खात्यात 10000 कोटी चा घोटाळा आहे यामध्ये विविध परवाने देण्यासाठी ऑनलाइन ऑफलाइन चा वापर करून गुणनियंत्रण विभागाचे अधिकारी घोळ करून निविष्ठा ची गुणवत्ता मॅनेज करून प्रयोगशाळा चे नियम बाजूला ठेवून खत बी बियाणे औषधे ची गुणवत्तेनुसार तपासणी न करता कृषी विभागांतर्गत उद्योजकांना निविष्ठा उत्‍पादन विक्री गुणनियंत्रण याचा संगणमत करून परवाना दिला जातात खते बी-बियाणे औषधे कीटकनाशके चे प्रेझेन्टेशन कंपन्यांना द्यावे लागते परंतु गुणनियंत्रण विभागातले अधिकारी लाचलुचपत घेऊन भ्रष्टाचार करून त्यांना सर्व परवाने देतात त्यामुळे शेतकऱ्यांना बोगस बियाणे खते औषधी राज्यातल्या व परराज्यातल्या कंपन्या पुरवीत आहेत कोणत्याही कृषी खात्याच्या अधिकार्‍याचे बोगस कारभारावर नियंत्रण नाही शासनाकडून कृषी खात्याची विविध विभागांची दक्षता पथक स्थापन करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा व त्यांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केलेला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतकऱ्याची पेरणी साठी जी बियाणे खते औषधे घेऊन गेलात ते उगवले नाहीत तर कृषी खात्याकडे तात्काळ अर्ज देण्यात यावेत असे आव्हान काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *