शेतकऱ्यांचे कर्जवाटप व कर्ज माफी होण्यासाठी भारतीय जनता पार्टी परळी च्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया समोर तीव्र निदर्शने

बीड
Spread the love

शेतकऱ्यांचे कर्जवाटप व कर्ज माफी होण्यासाठी भारतीय जनता पार्टी परळी च्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया समोर तीव्र निदर्शने

महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी व पीक कर्जासाठी आंदोलन पुकारले आहे त्याचाच भाग म्हणून परळी येथील भारतीय जनता पार्टी च्या वतीने लोकनेत्या माननीय पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशावरून आज स्टेट बँक ऑफ इंडिया समोर तीव्र निदर्शने केली.
राज्यात कोरोना चे संकट आहे म्हणून पाऊस,खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत. राज्य सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे या योजनेच्या बोजवारा उडालेला आहे,पीक कर्जाचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे भाजपने आंदोलनाचा निर्णय घेतला राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे व कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी. शेतकऱ्यांच्या घरातच कापूस,तूर,हरभरा पडून आहे, कर्जमाफी कागदावरच आहे. पीककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांमध्ये वारंवार अपमान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सकाळी बारा वाजता भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया राणी लक्ष्मीबाई टॉवर बँकेसमोर तीव्र निदर्शने केली व तहसीलदारांना जाऊन निवेदन दिले यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विजय गव्हाणे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, माजी पंचायत समिती सदस्य श्रीराम मुंडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. विजय मुंडे, राजेश गीते,नगरसेवक पवण मुंडे,प.स.सदस्य भरत सोनवणे, भास्कर फड.उमेश खाडे,चंद्रकांत देवकते, संजय मुंडे,मा.पंचायत समिती उपसभापती बिबीशन फड, रवि कांदे, बळीराम गडदे,माधवराव दहिफळे, अरुण पाठक, माऊली साबळे, नागनाथ कोपनर, बाळासाहेब शिंदे,संतोष सोळंके. किशोर गित्ते,माधव ईटके, योगेश पांडकर. भुराजी बदने, राजेंद्र ओझा, आनीश अग्रवाल, नरेश पिंपळे, मोहन जोशी, अश्विनी मोगरकर, नितीन समशैटी, गोविंद चोरे श्याम गीते, चैतन्य मुंडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *