राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनच; मिशन बिगीन अगेनचे जूनमधील नियम कायम

मुंबई
Spread the love

मुंबई : राज्यात एक जुलैपासून “मिशन बिगीन अगेन”च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा हा प्रयत्न आहे. यानुसार मागच्याच आठवड्यात राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, 31 जुलैपर्यंत ज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत. त्यात कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही. एकप्रकारे राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवले असे म्हणायला हरकत नाही.

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतला आवाहन केलंय की, अद्याप काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगेन अगेन सुरु करतोय. मात्र, लॉकडाउन सुरुच राहणार आहे. त्यानंतर, सरकारने 31 जुलैपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवला आहे.

राज्यातील कंटोनमेंट झोन क्षेत्रात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, 31 जुलैपर्यंत हा लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. मात्र, मिशन बिगेन अगेन १ मध्ये नागरिकांना जी सवलत देण्यात आली होती, ती या लॉकडाऊनमध्येही कायम असणार आहे. तर, मिशन बिगेन अगेन २ मध्ये हळू हळू इतरही सेवा सुरळीत करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. मात्र, शासनाचा आदेश येईपर्यंत हा लॉकडाऊन आणि शिथिलता देण्यात आलेल्या आस्थपनाच सुरु राहणार आहेत. नवीन सवलतींबाबत शासनाकडून वेळोवेळी माहिती देण्यात येईल.

काय आहे ‘मिशन बिगीन अगेन’चा दुसरा टप्पा?

३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन 6.0
मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात ज्या अटी-शर्ती होत्या त्या कायम ठेवल्या आहेत.
त्यानुसार महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 जुलै रात्री 12 पर्यंत लॉकडाऊन कायम असेल.
अत्यावश्यक दुकानं आणि ऑन-इव्हन नियमानुसारची नियमावली कायम
सरकारी आणि खासगी कार्यालयांची नियमावली ही कायम
राज्यात 31 जुलैपर्यंत जिल्हाबंदी आणि एसटी सेवा ही बंद
बिगीन अगेननुसार दिलेल्याच सवलतींना मुदतवाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *