दिव्य मराठी विरोधातील गुन्हे मागे घ्या;परळी पत्रकार संघाचे तहसिलदार यांना निवेदन

बीड
Spread the love

दिव्य मराठी विरोधातील गुन्हे मागे घ्या
परळी पत्रकार संघाचे तहसिलदार यांना निवेदन

परळी (प्रतिनिधी)
औरंगाबाद येथे कोरोना संदर्भात सत्य लिखाण करत प्रशासनाच्या चुका चव्हाट्यावर मांडल्यानंतर आपले अपयश झाकण्यासाठी प्रशासनाने दिव्य मराठीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा परळी पत्रकार संघाच्या वतिने निषेध करण्यात येवुन हे गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
औरंगाबाद महानगर भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या पार्श्वभुमीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा बाबत दैनिक दिव्य मराठीने सत्य परिस्थिती मांडल्यानंतर प्रशासनाने वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याच्या हेतूने व आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने दैनिकाचे संपादक, प्रकाशक व वार्ताहरावरच गुन्हे दाखल केले आहेत.प्रशासनाच्या या मुजोरपणाचा जाहीर निषेध करीत दैनिका विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे पोलिस प्रशासनाने तात्काळ मागे घेण्यात यावी व या कार्यपद्धतीत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत तहसिलदार यांना निवेदन दिले.या निवेदनावर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते,शहराध्यक्ष संभाजी मुंडे,कार्याध्यक्ष धीरज जंगले,ओमप्रकाश बुरांडे,प्रशांत प्र.जोशी,शिवशंकर झाडे,आत्मलिंग शेटे,रानबा गायकवाड यांच्यासह प्रा.रविंद्र जोशी(दै.पुढारी),प्रा.प्रविण फुटके (दै.सकाळ),धनंजय आरबुने(दै.पुण्य नगरी),धनंजय आढाव (दै.दिव्य मराठी),जगदिश शिंदे (दै.आदर्श गावकरी),दत्तात्रय काळे(दै.मराठवाडा साथी),स्वानंद पाटिल (दै.सामना),महादेव गित्ते(सायं.दै.अभिमान),माणिक कोकाटे(दै.आनंद नगरी),गणेश आदोडे(सायं.दै.सरकार),शेख बाबा(दै.जंग),संजीव रॉय (सुदर्शन न्युज),संतोष जुजगर (सायं.दै.रणझुंजार),सुकेशनी नाईकवाडे (एच.एम.न्युज),इंजि.भगवान साकसमुद्रे,बालाजी ढगे (दै.बीड नेता),प्रा.दशरथ रोडे (जनसन्मान),सेवकराम जाधव,अंबाजी मुंडे,सुरेश जाधव आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
@@@@@
तीव्र आंदोलन छेडु-संभाजी मुंडे
मागील काही महिन्यामध्ये पत्रकारांवर हल्ले करण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.यामुळे पत्रकारांचे जीवन असुरक्षीत बनले आहे.पत्रकारांना शस्त्र परवाने द्यावेत.दिव्य मराठीसह इतर पत्रकारांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *