पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात परळीत काँग्रेसचे जोरदार निदर्शने

बीड
Spread the love

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात परळीत
काँग्रेसचे जोरदार निदर्शने

(प्रतिनिधी )
पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ परळी तहसील कार्यालय समोर शहर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारने इंधन दरवाढ पेट्रोल-डिझेलची केल्यामुळे गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण वाढला असून पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंतराव मुंडे यांनी धरणे आंदोलनात केली आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बी बियाणे खते औषधी खूप मोठ्या प्रमाणावर राज आश्रयाने अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात वितरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले आहेत ते निकृष्ट असून बियाणे उगवले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे महाराष्ट्र सरकार कोरोना रोगाच्या लॉक डाउन मध्ये स्वस्त धान्य दुकान दारांना मोफत धान्य वाटप गोरगरीब जनतेला करण्यासाठी शासनाकडून दिले परंतु ते नियमाप्रमाणे जनतेपर्यंत पोहोचले नाही याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निदर्शने करुन केली आहे.
निवेदन परळीचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव मुंडे,ज्येष्ठ नेते गणपत अप्पा कोरे,जीएस सौंदळे , शहराध्यक्ष बाबू नंबरदार,कार्याध्यक्ष विश्वनाथ गायकवाड, सय्यद अल्ताफ, सुनिता मुंडे ,आशा कोरे , जावेद भाई, लहूदास तांदळे, शेख जावेद ,शेख जहीर, सुदाम लोखंडे,गुलाब देवकर,बाबुराव इंदुरकर गोपीनाथ जाधव शेख आसिफ गुड्डू राम घाटे सुदाम लोखंडे पांडुरंग सदरे सय्यद जाफर जब्बर शेठ शेख शारीरिक महादेव रोडे शेख सिकंदर , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ गायकवाड तर आभार प्रदर्शन सय्यद आलताप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *