संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस परिचारीका,कामगार व सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सत्कार करुन परळीत साजरा

बीड
Spread the love

संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस परिचारीका,कामगार व सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सत्कार व साडी-चोळी देऊन परळीत साजरा

परळी राकाॕ महिला आघाडीचा स्तुत्य उपक्रम

परळी वै…

संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.30 जून रोजी परळी शहरातील सामाजिक क्षेत्रातील महिला , रुग्णालयीन परिचारिका,अंगणवाडी सेविका , महिला सफाई कामगार यांना साडी,चोळी , मास्क,सॕनी टायझर,वृक्ष रोप व पुष्पहार देऊन परळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने गुणगौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या आदेशावरून व न,प गटनेते वाल्मीक आण्णा कराड व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
शहराध्यक्ष बाजीरावजी धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करून वाढदिवस साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या संयोजिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा सौ अर्चनाताई रोडे या होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या
सौ.चित्राताई देशपांडे,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ अन्नपूर्णाताई जाधव,शहर सरचिटणीस गोदावरीताई पोखरकर,
तालुका सरचिटणीस उमाताई धुमाळ व विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या
या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून लाभलेल्या ,
परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका
महिला सफाई कामगार,अंगणवाडी सेविका
अनेक महिला मंडळ उपस्थित होत्या.यावेळी आभार सौ गोदावरीताई पोखरकर यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *