दारुचे दुकाने उघडणार; पण बीड जिल्ह्यात माञ बंदच

बीड
Spread the love

दारुचे दुकाने उघडणार;
पण बीड जिल्ह्यात माञ बंदच

महाराष्ट्र सरकारनं आता रेडझोनमधील दुकानं उघडण्याची परवानगी दिली आहेत. त्यात दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. पण, रेड झोनमध्ये असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांसाठी ही सूट लागू नसेल. तेथील दुकाने सध्या उघडता येणार नाहीत.पण आॕरेंज आणी ग्रीनझोनमध्ये काही वेळासाठी उघडणार असल्याचे जाहिर करण्यात आले
असले तरी बीड जिल्ह्यात माञ अधिकची काळजी घेण्यासाठी दारुची दुकाने बंदच राहतील किंवा यासंबंधी कुढलीही शिथीलता देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढलेल्या आदेशात नमुद केले नाही.
याचाच अर्थ यापुर्वी प्रमाणेच जिल्ह्यात वाईन शाॕप बंद संबधी दिलेले आदेश लागु असणार आहेत.
यामुळे दारु शौकीतांचा हिरमोड झाला आहे.काही वाईन शाॕप धारकांनी आपल्या शाॕपपुढे मार्किंग केल्याचे चिञ रेखाटले होते हे मार्किंग पाहुन दारु पिणारांची हौस शिगेला गेली होती.चला आता हौस मज्जा करायला मिळणार म्हणुन मनसुबे बांधायला सुरुवात केली असतानाच बीड जिल्ह्यात वाईन शाॕप बाबत कुढलीच नियमावली किंवा आदेश दिसत नसल्यामुळे पुन्हा एकदा शौकितांचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे.कोरोनाचा जिल्हयात कुठे ही प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी जिल्हयाच्या स्थानिक प्रशासनाने घेतली असुन हा निर्णय स्वागताहार्य असल्याचे मत व्यक्त केली जात आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *