‘वाघांनो रडू नका’ पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केल भावनिक ट्वीट

मुंबई
Spread the love

‘वाघांनो रडू नका’ पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केल भावनिक ट्वीट

मुंबई | राज्यात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काल (८ मे) भाजपने विधापरिषदेच्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली. यात रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, प्रवीण दटके या ४ उमेदवारांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मात्र, विधानपरिषदेच्या यादीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये दुःख झाले. “वाघांनो असे रडताय काय मी आहे ना”, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत त्यांच्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे.

पंकजा मुंडेंनी ट्वीटमध्ये म्हटले, “आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असे रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *