विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध, काँग्रेसनं घेतला ‘हा’ निर्णय!

मुंबई
Spread the love

विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध, काँग्रेसनं घेतला ‘हा’ निर्णय!

मुंबई – विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध होणार असून काँग्रेसनं घेतलेल्या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कारण काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेतला आहे. महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तोडगा काढण्यात आला, त्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होत आहे.

दरम्यान काँग्रेसने कालच २ उमेदवारांची घोषणा केली होती. परंतु आजच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे आता काँग्रेसचा कोणता उमेदवार माघार घेणार हे पाहण गरजेचं आहे. काँग्रेसने बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश राठोड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोण आपली उमेदवारी मागे घेणार हे पाहण गरजेचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी घोषित केली, तर शिवसेनेनं उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित केली आहेत. तसेच भाजपने प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची संधी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *