‘शून्यापासून सुरू केले,चित्र चांगले जमेल थोड्या दिवसात’,पंकजा मुंडेंचे सूचक ट्विट!

मुंबई
Spread the love

‘शून्यापासून सुरू केले,चित्र चांगले जमेल थोड्या दिवसात’,पंकजा मुंडेंचे सूचक ट्विट!

मुंबई- स्वतःच स्वतःला शिकवते आहे..शून्यापासून सुरू केले..चित्र चांगले जमेल थोड्या दिवसात’ हा आशय वापरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वहस्ते काढलेले चित्र ट्विट केले आहे.ट्विटमध्ये वापरण्यात आलेल्या सूचक आशयामुळे अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तर दुसरीकडे मुंडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली नसल्याने आक्रमक झालेल्या पंकजा मुंडे समर्थकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना पंकजा मुंडे यांनी आता निर्णय घ्यावाच अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती.

आज पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर दोन पेंटिंग पोस्ट करताना ‘शून्यापासून सुरू केले,चित्र चांगले जमेल थोड्या दिवसात’असा सूचक मजकूर पोस्ट करून एक प्रकारे भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत.
शून्यापासून सुरुवात ते थोड्या दिवसात चित्र चांगले जमेल हे वाक्य अनेक सूचक अर्थ स्पष्ट करणारे असल्याने पंकजा मुंडे यांनी नेमकी कशाची सुरुवात केली आहे आणि कोणते चित्र चांगले जमत आहे याबाबत मात्र अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *