मी परिचारीका बोलतेय…

बीड
Spread the love

मी परिचारीका बोलतेय…

मी गेल्या २१ वर्षांपासून रूग्णसेवेमध्ये कार्यरत आहे आणि त्याचा मला मनापासून अभिमान आहे.
खरच परिचारीकेचची भूमिका बजावत असतांना असंख्य अडचणी, त्रासाला सामोरे जावे लागते.
एक परिचारीका म्हणून काम करत असतांना अनेक भूमिका साकार कराव्या लागतात. तिला प्रथम रूग्णाची आई व्हावे लागते. जेणेकरून रुग्ण मोकळेपणाने त्याच्या यातना तिला सांगेल. डॉक्टरांच्या कामात तीला मदत करावी लागते, तर रूग्णाला औषधोपचार देणे, त्याचे रेकॉर्ड तयार करून ठेवणे, त्याचा तपशील वरिष्ठांना कळवणे, थोडक्यात काय तर परिचारीका ही रुग्ण व्यवस्थेपनेचा पाठीचा कणा आहे आणि रुग्णालयाचा अविभाज्य घटक आहे. माणसाच्या पहिल्या श्वासाची आणि शेवटच्या तासाची ती साक्षीदार आहे. कारण जेंव्हा नविन जन्म होतो तेव्हा बाळाच्या पहिल्या ্वासावरच तिच लक्ष असतं आणि जेंव्हा एखाद्या रूग्णाचा मृत्यु होतो तेंव्हा शेवटचा वासदेखील तीलाच मोजावा लागतो. म्हणजेच जन्म ते मृत्युपर्यंतचा प्रवास तीला अनुभवावा लागतो. प्रत्येक क्षणाची ती साक्षीदार असते.

परिचारिका ही तीच्या घरासाठी आर्थिक पाठबळ तर देतेच पण त्याहीसोबतच ती घणातील प्रत्येकाची सेवाही करते. तरी एक आदर्श माता आहे. पत्नी आहे. भगीनी आहे.

मुलगी आहे आणि आता ततर सोल्जरदेखील आहे. संपूर्ण जगावर कोव्हीड-१९ने हाहाकार माजवला असतांना देखील ती डगमगली नाही.

खंबीरपणे या आजाराला तोंड देत आहे.

रूग्णांची सेवा करून रूग्णांना बरे करण्यात मोलाचा वाटा उचलत आहे. कोरोनाचा सामना करणे म्हणजे एकप्रकारे युध्दाला सामोरे गेल्यासारखे आहे. आज देश लॉकड़ाऊनमध्ये असतांना देखील परिचारीका कर्तव्यावर हजर आहेत. देशसेवेसाठी आपण कामाला येत आहोत हे जन्माला आलेला एक सौभाग्य आहे.

देशसेवेची मिळालेली संधी आहे. यामुळे मी यापुढे माझी सेवा अखंडीतपणे चालू ठेवणार आहे. माझ्या सर्व परिचारीकांना यामध्ये यश मिळो व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.

रूग्णसेवा हीच एअरसेवा…

-श्रीमती नीता भीमराव मगरे (सहाय्यक अधिसेविका)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *