गेवराई,माजलगाव व बीड तालुक्यातील कंटेंनमेंट व बफर झोन घोषित!

बीड
Spread the love

गेवराई,माजलगाव व बीड तालुक्यातील कंटेंनमेंट व बफर झोन घोषित!

जिल्ह्यात दोन कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खबरदारी

बीड….

मुंबई आणि पुण्याहून विना परवाना बीड जिल्ह्यात आलेल्या गेवराई आणि माजलगाव मधील प्रत्येकी एका व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे आता गेवराई तालुक्यातील इटकुर,हिरापुर,शिंपेगाव,कुंभारवाडी हे चार4 गावे व बीड तालुक्यातील खामगाव,नांदुर हवेली हे 3 गावे तर माजलगाव तालुक्यातील हिवरा बु,गव्हाणथडी,काळे गांवथडी,डुव्वाथडी व भगवान नगर हे गाव containment zone म्हणुन घोषीत करण्यात आली असुन गेवराई तालुक्यातील लोळदगाव अंकोटा,शहाजानपुर,चकला मादळमोळी कृष्ण नगर,पाडळसिंगी टाकळगाव हे 7 गावे व बीड तालुक्यातील आहेर चिचोली,कापरखेडा पेडगाव,हिगणी हवेली,पारगाव,सिरस 6 गावे तर माजलगाव तालुक्यातील राजेगाव,सुर्डी,महातपुरी,वाघासे व वाघोरा तांडा हे गाव buffer zone म्हणून घोषित करण्यात आले असुन हे containment zone,buffer zone घोषीत केलेले गावे पुढील आदेश येई पर्यत पुर्णवेळ बंद करण्यात आले असुन संचारबंदी लागु करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालया कडुन आदेशीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *