अनुसूचित जाती विद्यार्थी यांचे परदेशी शिष्यवृत्तीसाठी लागू करण्यात आलेली क्रिमिलियर अट रद्द करा-भास्कर रोडे

बीड
Spread the love

अनुसूचित जाती विद्यार्थी यांचे परदेशी शिष्यवृत्तीसाठी लागू करण्यात आलेली क्रिमिलियर अट रद्द करा-भास्कर रोडे

परळी… प्रतिनिधी
5 मे 2020 रोजी शासन निर्णयद्वारे अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या विशेष अध्ययन करण्यास्तव राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती मध्ये बदल करण्यात आले आहेत.
सदर शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांसाठी सहा लाख रुपयांची क्रिमिलियरची अट या नव्या सुधारणांमध्ये अनिवार्य केली आहे. ही बाब अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक असून यामुळे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी सोयी-सवलती देत असताना भारतीय संविधानाने मार्गदर्शक केलेल्या तत्त्वांच्या पूर्णतः विसंगत व विरुद्ध असल्याने सदर दुरुस्ती तातडीने रद्द होणे आवश्यक झाले असुन 5 मे 2020 रोजी शासन निर्णयाद्वारे राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेमध्ये लागू करण्यात आलेली क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे रिपाईच्या वतिने राज्य सचिव भास्कर रोडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *