नित्रूड, सुर्डी नजीक व कुंडी येथे कोरोनाचेे रुग्ण आढळल्याने कन्टेनमेंट झोन घोषित

बीड
Spread the love

*नित्रूड, सुर्डी नजीक व कुंडी येथे कोरोनाचेे रुग्ण आढळल्याने कन्टेनमेंट झोन घोषित,*
*पूर्णवेळ संचारबंदी लागू–जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

धारुर तालुक्यातील कुंडी येथे १, माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथे ११ आणि सुर्डी नजीक येथे १ असे कोरोना विषाणु बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत
याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन *धारुर तालूक्यातील कुंडी* या गावापासून ३ कि.मी. परिसरातील कुंडी, जैतापुर, सुकळी, मुंगी. शेरीतांडातहत (देवठाणा,) फकीरजयळा , माजलगांव तालूक्यातील वांगी आणि परळीे तालूक्यातील तपोवन , खामगांव हा परिसर कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे.
तसेच माजलगाव तालुक्यातील *नित्रूड या गावापासून* ३ कि.मी. परिसरातील नित्रूड, रेखानाईकतांडा, गोकुळतांडा, चंद्रभानतांडा, हरजळातांडा, शरीतांडा, बडेवाडी (आनंदवाडी), साळवणतांडा हा परिसर आणि *सुर्डीनजीक या गावापासून* ३ कि.गी. परिसरातील सुर्डीीनजीक, राजेगांव, फुलसिंगनगर हा परिसर कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *