पुन्हा बीड जिल्हयात नवे तीन कोरोनाग्रस्त

बीड
Spread the love

बीड : बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा वाढत असलेला आकडा आज पुन्हा वाढला असून आणखी तीन रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याची उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 33 तर एकूण रुग्ण संख्या 41 झाली आहे. शनिवारी पॉझिटिव्ह ठरलेल्यांमध्ये कुंडी ता.धारुर 1, वडवणी 1 आणि बीड 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्ण संख्येपैकी 6 लोक पुणे येथे उपचार घेत आहेत, 1 व्यक्ती कोरोनामुक्त झाला आहे तर एकाच मृत्यू झाला आहे.
शनिवारी बीड जिल्हयातुन 42 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 3 नमुने पॉझिटिव्ह आले, हे सर्व रुग्ण मुंबई, ठाणे भागातून प्रवास करुन आले आहेत.
त्यामुळे आता तालुका निहाय रुग्ण संख्या माजलगाव 15, बीड 6 , पाटोदा 3, केज 2 ,गेवराई 2, वडवणी 2, धारूर 2 , आष्टी 1 अशी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *