ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत 7 फेबु्रवारी रोजी परळीत रमाई जन्मोत्सव

परळी वैजनाथ
Spread the love

*ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत 7 फेबु्रवारी रोजी परळीत रमाई जन्मोत्सव*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या विशेष उपस्थितीत 7 फेबु्रवारी 2020 रोजी माता रमाई यांच्या 122 व्या जयंती निमित्त माता रमाई आंबेडकर प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक रमाई जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील भिमनगर येथे होणार्‍या या कार्यक्रमास उद्घाटक म्हणुन बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी प्रमुख अतिथी म्हणून गटनेते वाल्मिक कराड तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक चंदुलाल बियाणी, नगरसेवक दिपक देशमुख, रमेश सरवदे, माजी उपनगराध्यक्ष आयुबखॉन पठाण, पोलिस उपनिरीक्षक आनंद बनसोडे, उपनगराध्य शकिल कुरेशी, नगरसेवक नितीन रोडे, स्वच्छता सभापती किशोर पारधे, पाणी पुरवठा सभापती भावड्या कराड, नगरसेवक महादेव रोडे, राष्ट्रवादी कॉेग्रेसचे सरचिटणीस अनंत इंगळे,माजी नगराध्यक्ष जाबेर खॉन पठाण, नगरसेवक अनिल अष्टेकर, नगसेवक केशव गायकवाड, रवि तरकसे आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता भिमनगर येथुन भव्या शोभा यात्रा निघणार आहे.
मार्गदर्शक म्हणून वैजनाथ जगतकर, डॉ.विनोद जगतकर, शंकर साळवे, अनिल मस्के, बाबु आवचारे, प्रा.विलास रोडे, मधुकर जोगदंड, व्ही.आर.आदोडे, रमेश गायकवाड, धम्मा आवचारे, प्रा.राहुल जगतकर, संजय जगतकर, अशोक जगतकर, रावसाहेब जगतकर, वसंत बनसोडे, ज्ञानभाऊ जगतकर, मोहन समिंदरसवळे, सोपान ताटे, सोपान रोडे, भारत ताटे, रतन आदोडे, राहुल ताटे, संतोष आदोडे, नामदेव साळवे, अमोल आवचारे, राज जगतकर, प्रताप समिंदरसवळे, बालासाहेब जगतकर, अशोक ताटे, अमर रोडे, निलेश वाघमारे, धम्मा जगतकर, बबलू साळवे, भैय्या साहेब आदोडे आहेत. प्रसिध्दी प्रमुख म्हणून प्रा.बालाजी जगतकर हे आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुयोग आवचारे, उपाध्यक्ष निशांत बनसोडे, सचिव नितीन जगतकर, कोषाध्यक्ष इंजिनिअर प्रबुध्द सावंत व पदाधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *