यशराज पब्लिक स्कूल येथे आनंदनगरी उत्सहात साजरी…

परळी वैजनाथ
Spread the love

यशराज पब्लिक स्कूल येथे आनंदनगरी उत्सहात साजरी…

आज यशराज पब्लिक स्कूल सिरसाळा येथे आनंदनगरी साजरी करण्यात आले.या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून प्रमुख पाहुणे सौ.भाग्यश्री संजय जाधव (सरपंच गोवर्धन हिवरा), संजय जाधव (सामाजिक कार्यकर्ते), बिभीषण जाधव (सामाजिक कार्यकर्ते), रवि निर्मळ, भारत देवकते, ज्ञानेश्वर तपसे, पठाण जमालखान, पठाण सरदार, बाळासाहेब मोहीते, देशमुख प्रविण, अंकुश मेंडके, संतोष मेंडके, प्रदीप निर्मळ, देवकते धनराज ई. सौ.भाग्यश्री मैडम यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांचे चव घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यामुळे मैडमचे मनापासून आभार मानतो. तसेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून विकले तसेच या कार्यक्रमाचा उद्देश हे की, मुलांना आथिर्क व्यवहार व व्यवहारात नफा / तोटा या विषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावा.
सर्वात विशेष म्हणजे शाळेचे अध्यक्ष श्री. जनक उबाळे सरांनी आपल्या या ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून कलागुणांना वाव मिळावा यासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्याबद्दल सरांचे अगदी मनापासून आभार. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *