योजनेचे लाभार्थी नसणाऱ्या व्यक्तींसाठीसुध्दा योजनेअंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड
Spread the love

*योजनेचे लाभार्थी नसणाऱ्या व्यक्तींसाठीसुध्दा योजनेअंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार-जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

* योजनेअंतर्गत अंगीकृत जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांची नावे जाहीर

*योजनेतील बदल हा 31 जुलै 2020 पर्यंत लागू

बीड, दि. २:-महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत ज्या अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये उपचार होतात त्यासर्व रुग्णालयांमध्ये आता योजनेचे लाभार्थी नसणाऱ्या व्यक्तीसाठीसुध्दा उपचार अनूज्ञेय राहतील असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले आहे .

सदरील उपचार हे महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत असणारे 996 उपचारापैंकी असणे आवश्यक आहे. सदरील योजना ही कोरोना बाधित रुग्णांसाठीसुध्दा आहे.या शासन निर्णयाचा फायदा घेण्यासाठी लाभार्थीकडे राज्यातील रहिवास सिध्द करण्यासाठी वैध पिवळी ,केशरी किंवा शुभ्र शिधापत्रिका किंवा अधिभास प्रमाणपत्र किंवा तहसिलदार यांचा दाखला सादर करावा लागेल त्याबरोबरच शासन मान्य फोटो ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

996 उपचारापैंकी जे 134 उपचार शासकीय रुग्णालयास राखीव ठेवलेले होते त्यापैंकी यासोबत जोडलेल्या प्रपत्र मधील 120 उपचार वरील शासन निर्णय प्रमाणे अंगीकृत खालील रुग्णालयांना सुध्दा करता येतील.

तसेच 996 उपचारा व्यतीरीक्त यासोबत जोडलेल्या प्रपत्र क मधील 67 उपचार व तपासण्या या अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये CGISच्या दरानूसार (NABH/NABL) उपलब्ध करण्यात देण्यात येतील.

खाजगी अंगीकृत रुग्णालयांना वरीलप्रमाणे कोरोना संशयीत रुग्णांवर उपचार करण्याकरिता आवश्यक असणाऱ्यां PPE किट व N95मास्क यांचा खर्च शासनाने ठरविलेल्या दरानूसार देण्यात येईल.तसेच वरील सर्व उपचारांसाठी योजनेच्या नियमाप्रमाणे खर्चाची प्रतिपुर्ती संबधित रूग्णालयाला राज्य शासनाव्दारे हमी तत्वावर करण्यात येईल.

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक 23 में 2020 रोजी शासन निर्णयाप्रमाणे सदरील योजनेतील बदल हा 31 जुलै 2020 पर्यंत अंमलात राहिल. त्यानंतर याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येईल. या योजनेच्या तपशीलावर माहितीसाठी तालुकानिहाय असलेल्या अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे यासोबत रुग्णालयांची यादी प्रसिद्ध केली आहे
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *