कर्मप्रधान भक्तीचा आदर्श म्हणजे गुरु रविदास महाराज – बाजीराव धर्माधिकारी

परळी वैजनाथ
Spread the love

*कर्मप्रधान भक्तीचा आदर्श म्हणजे गुरु रविदास महाराज – बाजीराव धर्माधिकारी*

_शिवाजीनगर भागातही  संत रविदास महाराज सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देणार_

परळी वैजनाथ /प्रतिनिधी. …
     उज्ज्वल भारतीय संत परंपरेत विविध संतांनी मानवी जीवन उन्नतीचा मार्ग दाखवला. या मध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. भक्ती क्षेत्रात कर्मप्रधान भक्तीचा आदर्श म्हणजे गुरु रविदास महाराज असप्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.
       संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती शिवाजीनगर येथे साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी हे होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे पुजन करण्यात आले. यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले की, गुरु रविदास महाराज भारतीय संत परंपरेतील एक महान संत होवून गेले आपल्या कर्मप्रधान, मानवतावादी,डोळस सिद्धांताच्या विचारधारेवर संपूर्ण भारतात ते वंदनीय आहेत.गुरु ग्रंथ साहिब मध्ये देखील 41 रचना रविदासजी महाराज रचित आहेत.अनुप जलोटा यांनी गायलेले “प्रभुजी तुम चंदन हम पाणी” हे भजन देखील त्यांनी लिहिलेले आहे.संत रविदासजी महाराज यांची जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता विचारांचा लोकोत्सव झाला पाहिजे हे प्रतिपादन केले त्याच बरोबर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने गणेशपार भागात भव्य संत रविदास महाराज सभागृह चे बांधकाम प्रगतिपथावर असून शिवाजीनगर भागार देखील सभागृहासाठी लवकरच जागा उपलब्ध करुन देवू असे अभिवचन या प्रसंगी दिले.
        या जयंती चे अध्यक्ष जगन परदेशी , उपाध्यक्ष सचिन परदेशी, कोषाध्यक्ष रोहित वाघमारे, आयोजक बालासाहेब शिंदे, ज्येष्ठ नेते वैजनाथ सोळके, रवींद्र परदेशी, स्वच्छता सभापती किशोर पारधे,युवक नेते बालाजी चाटे, पिंटू मुरकुटे, महेश मुंडे, रघुनाथ शिंदे, सुभाष परदेशी, अभियंता ईंगळे, शेळकेे,भीमा पवळे, पत्रकार दिलीप बद्दर, मुकेश कांबळे, नारायण कांबळे, काळे, साई शिंदे, शांतीनाथ शिंदे, संदीप वाल्मिक, लखन काळे, बबन माने, मिथुन परदेशी, अजय परदेशी, रिंकू परदेशी, प्रेम परदेशी, वैजनाथ चव्हाण. सह पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *