दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आज आयोजन

परळी वैजनाथ
Spread the love

दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आज आयोजन

*परळी प्रतिनिधी*……

दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या 71 व्या जयंतीनिमित्त परळी शहरात आज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक सोपान ताटे यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की शहरातील मिलिंद महाविद्यालयात सायंकाळी पाच वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघटनेचे नेते पी एस घाडगे हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन विकास मंच संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दयानंद स्वामी, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रा.दासु वाघमारे,राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाळासाहेब देशमुख,एकतावादी रिपाई मराठवाडा अध्यक्ष विजय साळवे,प्रा.डॉ.मेश्राम सर, नगरसेवक गोपाळ आंधळे,प्रा. डॉ.विनोद जगतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी अध्यक्ष दिपक देशमुख, स्वच्छता सभापती किशोर पारधे, प्रा.डॉ. माधव रोडे,काँग्रेसचे ज्येष्ठनेते वसंत मुंडे,माजी न.प. कार्यालयीन अधिक्षक तु.रा. बनसोडे, प्रा.विलास रोडे,संपादक रानबा गायकवाड, कामगारनेते आर.एच.व्हावळे, माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण,स्वच्छता निरीक्षक शंकर साळवे, माजी जि.प.सदस्य विजयकुमार गंडले,संपादक बाळासाहेब जगतकर,राष्ट्रवादी काँग्रेसनेते आनंद इंगळे,प्रभाकर गवळी आदी मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सोपान ताटे आदींनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *