परळीच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलन स्थलांतरित करण्यासाठी व्यापाऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

परळी वैजनाथ
Spread the love

*परळीच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलन स्थलांतरित करण्यासाठी व्यापाऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.14 – परळीत सुरू असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलनस्थळी लावलेल्या भोंग्यांमुळे होणाऱ्या गोंधळामुळे आता परिसरातील व्यापारी,नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली दिसून येत आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराजवळच्या रस्त्यावर हे आंदोलन सुरू असल्याने हे आंदोलन इतरत्र स्थलांतरीत करण्याबाबतचे निवेदन व्यापारी, नागरिकांनी परळी उपजिल्हाधिकारी यांना दिले आहे.महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनाला कुठल्याच प्रकारची प्रशासनिक परवानगी भेटलेली नसताना गेले 20 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांना याबाबतचे निवेदन आज दुपारी 12 वा देण्यात आले असून यावर ते काही कारवाई करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

वैद्यनाथ मंदिर परिसराजवळच असलेल्या नेहरू चौक (तळ) येथे हे आंदोलन सुरू असून,
शहर पोलिस स्टेशन व संभाजीनगर पोलीस स्टेशन इथून बाजूलाच आहे.तसेच आजुबाजुला घरे व काही व्यावसायिक दुकाने व शाळा आहेत.आंदोलनात सततच्या घोषणांनी,भाषणांनी व कर्कश भोंग्यामुळे बाल,अबाल वृद्धांसह रहिवाशी कुटुंबाना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच येत्या काळात महाशिवरात्री व 10 वी, 12 वी बोर्ड परिक्षा चालू होणार आहेत.याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांवरही होण्याची शक्यता आहे.आंदोलकांनी त्यांचे आंदोलन सुरू ठेवावे,मात्र प्रशासनाने हे आंदोलनला शहरात इतरत्र स्थलांतरित करावे अशी मागणी या निवेदनात नागरिक,व्यापाऱ्यांनी केली आहे.निवेदनावर व्यापारी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून या निवेदनाची प्रतिलिपी मुख्याधिकारी नगर परिषद,पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे यांनाही देण्यात आली आहे.महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाबाबत प्रशासननाने काहीतरी भूमिका घ्यावी अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *