नगर परिषदेच्या महाशिवरात्र महोत्सवाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न ; , उद्या शनिवारी रंगणार कुस्त्यांची दंगल..

परळी वैजनाथ
Spread the love

*नगर परिषदेच्या महाशिवरात्र महोत्सवाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न ; , उद्या शनिवारी रंगणार कुस्त्यांची दंगल…*

परळी (दि. २१) —– : महाशिवरात्री महोत्सवानिमित्त परळी नगर परिषदेच्या वतीने आयोजित यात्रा महोत्सवाचे आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज सायंकाळी उद्घाटन संपन्न झाले. तर उद्या (दि. २२) दुपारी १.०० वाजल्यापासून जंगी कुस्त्यांची दंगल परळीत रंगणार आहे.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नगर परिषदेच्या वतीने भव्य महाशिवरात्री महोत्सव आयोजित केला आहे. या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी (दि.२२) परळी केसरी च्या किताबासाठी जंगी कुस्त्यांची दंगल रंगणार आहे.

शहरातील अमर मैदान येथे या कुस्त्या रंगणार असून यावेळी १०० रुपयांपासून ते ४० हजार रुपयांपर्यंत बक्षिसांच्या विशेष कुस्त्याही लावण्यात येणार आहेत. तर अखेरची कुस्ती ही परळी केसरी या बहुमानासाठी आहे. चांदीची गदा व रोख ५१ हजार रुपये असे या किताबाचे स्वरूप असणार आहे.

या कुस्त्यांच्या दंगलींसाठी माजी महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, काकासाहेब पवार, शिवाजी केकान आदींसह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर व प्रसिद्ध मल्ल उपस्थित राहणार असून, या स्पर्धेत परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील मल्लांनी व कुस्ती शौकिनांनी उपस्थित राहावे असे आवाहन परळी नगर परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.

*भव्य यात्रा महोत्सव*

धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने तीन दिवसाचा भव्य यात्रा महोत्सव आयोजित केला आहे. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने भव्य विभागीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात नाथ प्रतिष्ठाननेही आपला सहभाग नोंदवला आहे. नगर परिषदेच्या वतीने यात्रेसाठी आलेल्या व्यापाऱ्यांसाठी जागा, पाणी, लाईट आदींची सोय करून देण्यात आली असून विविध खेळणी च्या वस्तू, रहाट पाळणे आदींनी बाजार भेट गजबजून गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *