दाऊतपूर येथे शाॅर्टसर्किट झाल्याने घर  आगीत भस्मसात !

परळी वैजनाथ
Spread the love

_दाऊतपूर येथे शाॅर्टसर्किट झाल्याने घर  आगीत भस्मसात !_

*पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे तातडीने घटनास्थळी ; कुटुंबाला दिला आधार*

परळी दि. २१ —-शहरापासून जवळच असलेल्या दाऊतपूर येथे आज दुपारी शाॅर्टसर्किट झाल्याने एक  घर आगीत भस्मसात झाले. गरजू विद्यार्थ्यांना सामान्य परिस्थिती असलेल्या कुटुंबाचे घर संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले व मोठे नुकसान झाले.ही माहिती कळताच पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे तातडीने घटनास्थळी गेल्या. प्रत्यक्षात पाहणी करुन या  कुटुंबाला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आधार दिला.

    दाऊतपूर ता. परळी येथील सखूबाई लहूदास मुंडे यांचे राहते घर आज दि. २१ रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास  वीजेचे शाॅर्टसर्किट झाल्याने आगीत भस्मसात झाले. संसारोपयोगी साहित्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे यात मोठे नुकसान झाले. पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी दाऊतपूर येथे जाऊन नुकसानग्रस्त घराची पाहणी केली व सखूबाईंना धीर दिला. तसेच त्यांना राशन भरून गरजेच्या वस्तू गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे तात्काळ पाठवून देण्याचे आश्वासन दिले. कुटूंबातील सदस्यांनी यावेळी त्यांचे ऋण व्यक्त केले. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, वैद्यनाथ बॅकेचे संचालक रमेश कराड, दिलीप आबा बिडगर, युवा नेते नीळकंठ चाटे, नगरसेवक पवन मुंडे, किशोर केंद्रे, सचिन गिते आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
••••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *