ना.मुंडे साहेब लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी औरंगाबाद ते भगवान गड युवाकाचा मशाल घेऊन पायी प्रवास

बीड
Spread the love

*ना.मुंडे साहेब लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी औरंगाबाद ते भगवान गड युवाकाचा मशाल घेऊन पायी प्रवास*

सामाजिक न्यायमंञी तथा राष्ट्रवादीचे दिग्घजनेते ना.धनंजय मुंडे कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आल्याने युवक वर्गाला फार मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे.ना.मुंडे साहेब कोरोनातुन लवकर बरे व्हावेत व त्यांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने देवाकडे प्रार्थना केल्या जात आहेत.
ना.धनंजय मुंडेवर जिवापाड प्रेम करणारा औरंगाबाद येथील अमोल ताटे नावाचा एक युवा कार्यकर्ता औरंगाबाद ते श्री संत भगवान बाबा गडावर हाती मशाल घेऊन निघाला आहे.ना.साहेब हे लवकर कोरोनातुन मुक्त व्हावेत अशी मनोभावना घेऊन पायी चालत निघाला आहे.कार्यकर्त्याला जिवाला जिव लावणारा असा नेता ना.धनंजय मुंडे यांची प्रचंड क्रेज महाराष्ट्रात आहे.भाजप सरकारच्या विरोधात हल्लाबोल,लोकसभा व विधानसभेच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला होता.व आपल्या वक्तृत्वाने संपुर्ण महाराष्ट्रातील युवकाना आकर्षित केले होते याचाच परिणाम म्हणून राज्यात सत्तांतर घडण्यास मदत झाली होती.यामुळे ना.मुंडेंची संपुर्ण युवा वर्गात आस्था प्रेम जिवाळा निर्माण झाला आहे म्हणुन साहेब कोरोना पाॕझिटिव्ह झाल्याची बातमी या युवा वर्गाला धक्का देणारी ठरली आहे.साहेब लवकर कोरोना मुक्त व्हावे यासाठी वेगवेगळ्या प्रार्थना स्थळाला प्रार्थना करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *