परळी-अंबाजोगाई रस्त्याच्या कामाला कसलीही स्थगिती नाही

परळी वैजनाथ
Spread the love

*परळी-अंबाजोगाई रस्त्याच्या कामाला कसलीही स्थगिती नाही*

*आठवडाभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार-कार्यकारी अभियंता स्वामी*

*परळी दि. 22……. : परळी-अंबाजोगाई (पिंपळा धायगुडा) या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला कसलीही स्थगिती नसुन येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष या कामाला सुरूवात होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग लातूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.स्वामी यांनी सांगितले आहे.*

परळीतील मौलाना आझाद चौक परळी ते पिंपळा धायगुडा ता. अंबेजोगाई या रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन 25 जानेवारी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.

या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जुन्या कंत्राटदाराचा जुना करार रद्द झाल्याशिवाय नविन कामाला सुरूवात करता येत नाही. जुना करार रद्द करण्याची प्रक्रिया व नविन कराराची प्रक्रिया दिल्ली येथे अंतिम टप्प्यात असुन ती बुधवार पर्यंत पुर्ण होऊन लगेचच प्रत्यक्ष या रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले.

या रस्त्याचे काम अतिशय जलद गतीने व चांगल्या क्वालिटीचे करण्याबाबत श्री.धनंजय मुंडे हे आग्रही असुन डिसेंबर 2020 अखेर हे काम पुर्णत्वास येईल असा विश्वास स्वामी यांनी व्यक्त करून कामाला स्थगिती मिळाल्याच्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवु नये असे आवाहन केले आहे.

या कामासाठी ए.जी. कन्स्ट्रक्शन्स व राजेंद्रसिंग भल्ला इन्फ्रास्ट्रक्चर औरंगाबाद या कंत्राटदारांची नव्याने नेमणूक करण्यात आली असून 99.99 कोटी रुपयांच्या या कामास पूर्ण होण्यासाठी अंदाजे 18 महिने एवढा कालावधी अपेक्षित आहे.
या रस्त्यामध्ये 10 मीटर रुंदीचा मुख्य काँक्रिट रस्ता व दुचाकींसाठी स्वतंत्र 1.5 मीटर रस्ता दोन्ही बाजूंनी अशा प्रकारची अद्ययावत सुविधा त्याचबरोबर आवश्यकतेनुसार पथदिवे, दुभाजके, बसथांबे, गटारे, शेतीसाठी पाईपलाईन आदींचेही बांधकाम करण्यात येणार आहे.
पूर्वीच्या कंत्राटदारांच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक वर्षे हा रस्ता रखडून होता, यासाठी नागरिकांनी अनेक आंदोलने देखील केली होती. ना. धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षात असतानाही या गोष्टींचा पाठपुरावा केला होता. तसेच निवडणुकीतही आपण या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढू असा शब्द परळीकरांना दिला होता. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून त्यांनी रखडलेल्या या महामार्गाचे काम नव्याने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दलही दिलगीरी व्यक्त केली असून थोड्याच महिन्यांत नागरिकांना होणारा त्रास बंद होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *