पंकजाताई मुंडे यांनी दाऊतपूरच्या ‘त्या’ कुटूंबियांना दिला मदतीचा हात

परळी वैजनाथ
Spread the love

*पंकजाताई मुंडे यांनी दाऊतपूरच्या ‘त्या’ कुटूंबियांना दिला मदतीचा हात !*

*गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सखूबाईंना पाठवले धान्य अन् आवश्यक चीजवस्तू*

परळी दि. २१ — दाऊतपूर येथे शाॅर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या सखूबाई मुंडे यांच्या घरी दिलेल्या शब्दाप्रमाणे पंकजाताई मुंडे यांनी आज धान्य आणि जीवनावश्यक चीजवस्तू पाठवून त्यांना मदतीचा हात दिला. सामाजिक जाणिवेतून त्यांनी केलेल्या या मदतीमुळे सखूबाई व त्यांचे कुटूंबिय भारावून गेले.

    दाऊतपूर येथील सखूबाई लहूदास मुंडे यांचे राहते घर आज काल दुपारी शाॅर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाले. आगीत संसारोपयोगी साहित्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सखूबाई हवालदिल झाल्या होत्या. ही घटना समजताच पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी रात्री दाऊतपूर येथे जाऊन नुकसानग्रस्त घराची पाहणी केली व सखूबाईंना धीर दिला. तसेच त्यांना राशन भरून गरजेच्या वस्तू गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे तात्काळ पाठवून देण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या शब्दाप्रमाणे आज पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची एक टीम त्यांच्या घरी पाठवली आणि त्यांना धान्य व सर्व आवश्यक ते संसारोपयोगी साहित्य पाठवून त्यांना धीर दिला, त्यांनी केलेल्या या मदतीमुळे सखूबाई व त्यांचे कुटूंबिय भारावून गेले.
••••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *