आपलं गाव आपलं शहर स्वच्छ ठेवा हा नारा कर्मयोगी गाडगेबाबानी दिला-शंकर कापसे

परळी वैजनाथ
Spread the love

*आपलं गाव आपलं शहर स्वच्छ ठेवा हा नारा कर्मयोगी गाडगेबाबानी दिला-शंकर कापसे*

परळी,(प्रतिनिधी):-महाराष्ट्र ही संताची, महापुरुषांची भूमी आहे. संतांनी, महापुरुषांनी समाजाला स्वच्छतेची, मानवतेची, बंधुभावाची शिकवण दिली. आपलं गाव, आपलं शहर स्वच्छ ठेवा हा नारा कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी समाजाला दिला. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी दिन, दुबळ्या लोकांची सेवा, करण्यात घालवल. असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शंकर कापसे यांनी मराठवाडा साथी सभागृहात आयोजित संत गाडगेबाबा यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शंकर कापसे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बुरांडे आप्पा, दैनिक आदर्श गावकरी तालुका प्रतिनिधी जगदीश शिंदे, अजय पुजारी, ओम काळे,आनंद हाडबे, आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना कापसे म्हणाले की, कर्मयोगी संत गाडगेबाबा संपूर्ण समाजाला स्वच्छतेची शिकवण दिली. कर्मकांड अंधश्रद्धाच्या या खाईत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्याचे काम कीर्तनाच्या माध्यमातून गाडगेबाबांनी आयुष्यभर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *