प्रभू वैद्यनाथ पालखीने पारंपरिक  महोत्सवाची सांगता

परळी वैजनाथ
Spread the love

*प्रभू वैद्यनाथ पालखीने पारंपरिक  महोत्सवाची सांगता*

_पं.धनंजय म्हसकर व प्राजक्ता काकतकर यांच्या  गायनाने श्रोते मंत्रमुग्ध !_

  परळी वैजनाथ(प्रतिनिधी) –          
     शहरात महाशिवरात्री नंतर निघणाऱ्या प्रभू वैद्यनाथाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात तथा पारंपरिक पद्धतीने पार पडला. चांदीने मढवलेल्या पालखीत श्री प्रभु वैद्यनाथांची मुर्ती ठेवण्यात आली होती. वैद्यनाथ मंदिरातून पालखी सोहळ्याचे सायं. ६ वा.सुमारास प्रस्थान झाले.प्रभू वैद्यनाथाची पालखी देशमुख पार, अंबेवेस, बांगर गल्ली, गणेशपार, नांदूरवेस, गोपनपाळे गल्ली या भागातील भाविक भक्तांनी प्रभू वैद्यनाथाच्या पालखीचे भव्य स्वागत केले.पालखीच्या स्वागतासाठी भक्तांनी पालखी मार्ग रांगोळयाची आरास काढून रोशनाईने सजवला होता.
        महाशिवरात्री निमित्त देशमुख पारावर वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने रविवारी ( दि. २३) सायंकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक पं. धनंजय म्हसकर व प्राजक्ता काकतकर मुंबई यांची संगीत संध्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने त्यांचे  स्वागत करण्यात आले.भक्तीगीत गायन व विविध भक्तिगीते, भावगीते आदि सादर करून शास्त्रीय गायकीची मेजवानीच परळीकर रसिकांना मिळाली. देशमुख पार परिसर या कार्यक्रमामुळे  रसिक व भाविकांनी फुलून गेले होता.
      प्रभु वैद्यनाथाची पालखी मंदिरातून सवाद्य मिरवणुकीने निघुन देशमुख पार येथे विसावली. याठीकाणी भक्तीगीत व अभंगवाणी कार्यक्रम संपन्न झाला. तसेच अंबेवेस येथे शोभेची दारू उडविण्यात आली.त्यानंतर गणेशपार, नांदूरवेस व गोपनपाळे गल्ली येथे कलावंतांची हजेरीचा पारंपरिक  कार्यक्रम व अंबेवेस मार्गे नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाली. या मिरवणूकीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांच्यासह विश्वस्त प्रा. प्रदिप देशमुख, प्रा. बाबासाहेब देशमुख, विजयकुमार मेनकुदळे नंदकिशोर जाजू, अनिल तांदळे, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे,शरद मोहरीर, नागनाथराव देशमुख, रघुनाथ देशमुख , पुजारी मानकरी,ब्रह्मवृंद, सांगीतिक सेवा देणारे कलाकार, भोई बांधव, भालदार, चोपदार , मशालधारी देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी, वासुदेव, पोलिस बांधव,यांचे सह भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *