सावतामाळी मंदीरातील महाशिवराञी निमीत्त सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवाची मा.अजयजी मुंडे यांच्या उपस्थीतीत उत्साहात सांगता*

परळी वैजनाथ
Spread the love

*सावतामाळी मंदीरातील महाशिवराञी निमीत्त सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवाची मा.अजयजी मुंडे यांच्या उपस्थीतीत उत्साहात सांगता*
परळी ( प्रतिनीधी ) महाशिवराञी व स्वानंंद सुखनीवासी सद्गुरु जोग महाराज शतकोत्तर पुण्यतीथी निमीत्त आयोजीत श्रीसंत सावता महाराज मंदीरात दिनांक १९ पासुन सुरु असलेल्या पंचदीवशीय कीर्तन सोहळयाची २३ रोजी जील्हा परिषद सदस्य तथा गटनेते अजयजी मुंडे यांच्या उपस्थीतीत श्री ह.भ.प.शिवाजी महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने मोठया उत्साहात भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. — गेल्या पाचदीवसापासुन श्रीसंत सावता माळी मंदीर येथे परळीचे सुपुञ वेदांताचार्य श्री हभप अर्जुन महाराज शिंदे (श्रीक्षेञ रुषीकेश ) यांच्या नेञत्वाखाली आळंदी व रुषीकेश तीर्थक्षेञातील वेदशास्ञ पंडीत थोर तपस्वी महापुरुषांच्या उपस्थीतीत आजपासुन पंचदीवशीय भव्य किर्तन महोत्सव सोहळयास मोठया उत्साहात पार पडला.पहिल्या दिवसा पिसुनच कीर्तन सेवेस भावीकांची अलोट गर्दी उसळली होती या सोहळयामुळे श्रीसंत सावतामाळी मंदीरात अक्षरशा पंढरपुर अवतरले. कीर्तन महोत्सवाच्या पहिल्याच दिवशीच्या सकाळच्या सञातील कीर्तनसेवा सकाळी १० ते १२ यावेळेत ह.भ.प.सुभाष महाराज गायकवाड ( आळंदी ) तर संध्याकाळची कीर्तनसेवा श्री ह.भ.प.उध्दव महाराज फड ( आळंदी ) यांचे हरीकीर्तन झाले सप्ताहाच्या दुसर्यादीवशीची कीर्तनसेवा श्री हभप उध्दव महाराज गोरे यांनी भक्तीमार्गाच्या साधनेतुनच संत संगतीने भगवंत प्राप्ती साधता येत असल्याचे सांगीतले.पहिल्या दिवशीची सकाळच्या सञात श्री गायकवाड महाराजांनी श्री शिवचरीञावर प्रकाश टाकत छञपती शिवरायांमुळेच भारताची उज्वल हिंदुधर्म संस्कृती परंपरा आबाधीत असल्याचे सांगीतले.कीर्तनास परळी पंचक्रोशीतील असंख्य भावीक भक्तांनी मंदीर परिसर फुलुन गेला होता. गुरुवार दिनांक २०/०२ रोजी सकाळी १० ते १२ श्री हभप उध्दव महाराज गोरे आळंदीकर तर सायंकाळच्या सञात राञी ०८ ते १० श्री हभप बाबा महाराज सोन्नर आळंदीकर यांचे कीर्तन संपन्न झाले उद्या दिनांक २१/०२ शुक्रवार रोजी सकाळच्या सञात श्री हभप अरुण महाराज माने आळंदी तर संध्याकाळच्या सञात श्री हभप सिध्देश्वर महाराज जाधव रुषीकेश तर शनिवार दिनांक २२/०२ रोजी सकाळच्या सञात श्री हभप वेदांताचार्य संतोष महाराज गायकवाड रुषीकेश तर सायंकाळच्या सञात श्री हभप वेदांताचार्य अर्जुन महाराज शिंदे रुषीकेशयांचे तर रविवार दिनांक २३/०२ रोजी सकाळी १० ते १२ श्री हभप गुरुवर्य भागवताचार्य शिवाजी महाराज जाधव आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन मोठय उत्साहात संपन्न झाले.या कीर्तन सोहळयास सामाजीक न्यायमंञी मा.ना.धनंजयजी मुंडे यांच्या मातोश्री रुक्मीणबाई मुंडे, तर काल्याच्या कीर्तनास बीड जीपचे गटनेते मा.अजयजी मुंडे यांच्यासह या प्रभागाचे न.प. सदस्य गोपाळ आंधळे, व्यंकटेश शिंदे यांच्यासह अनेक मांन्यवरांच्या प्रमुख उपस्थीतीत काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. या कीर्तन मोहोत्सवास व ज्ञानाम्रत सोहळयास श्रीसंत सावतामाळी सेवा समाजासह परिसरातील सर्व भावीक भक्तांनी मोठया उत्साहात सहकार्य करुण हा सप्ताह यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *