भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी खा. डॉ. प्रीतमताई मुंडे

मुंबई
Spread the love

भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी खा. डॉ. प्रीतमताई मुंडे

 बाबांच्या आशिर्वादाने आणि पंकजाताईंच्या साथीने मिळालेली जबाबदारी यशस्वी पार पाडणार 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपची राज्य कार्यकारिणी आज शुक्रवारी जाहीर करण्यात आली असुन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बीडच्या लोकप्रिय खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बाबांचे (गोपीनाथराव मुंडे साहेब) यांच्या आशीर्वादाने आणि पंकजाताई यांच्यामुळे मिळालेली जबाबदारी यशस्वी पार पाडणार असल्याची ग्वाही खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी दिली. 

       भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १२ प्रदेश उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस अशी भाजपची कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये प्रदेश उपाध्यक्षपदी खासदार प्रीतमताई मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. मुंडे भगिनींना पक्षात कोणते पद मिळणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले होते. या निवडीत बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. प्रितमताई यांच्या निवडीने बीड भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भाजपाची कार्यकारिणी, महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक. उपाध्यक्ष – राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हळवणकर, प्रितम मुंडे, चित्रा वाघ, प्रसाद लाड, भारती पवरा, जयप्रकाश ठाकूर. 

दरम्यान निवडीनंतर नवनिर्वाचित उपाध्यक्षा खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी ट्वीट केले असून बाबांचे आशिर्वाद, भाजपाचे संस्कार आणि पंकजाताई मुंडे यांच्या साथीमुळे मला एवढी मोठी जबाबदारी मिळाली असुन ती आपण सार्थ यशस्वी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *