गुरुपौर्णमेनिमित्त पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या गुरूंचे केले स्मरण

बीड मुंबई
Spread the love

गुरुपौर्णमेनिमित्त पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या गुरूंचे केले स्मरण

बीड (प्रतिनिधी) आज (५ जुलै) गुरूपोर्णिमा असल्याकारणाने अनेक जणांनी आपल्या गुरु विषयी आपल्या भावना मांडल्या आणि त्यांचे आभारही मानले. सर्वांच्या आयुष्यातील पहिले गुरू हे आई वडील असतात. गुरुकडून आपल्याला मिळणाऱ्या विद्येबद्दल गुरुची पूजा करणे, या दिवशी अपेक्षित असते. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील त्यांच्या गुरूचे स्मरण केले आहे.

पंकजा मुंडे यांचे गुरू म्हणजे त्यांचे वडिल गोपीनाथ मुंडे. ज्यांचं बोट धरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आज त्यांची उणीव त्यांना भासते आहे. आज गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी ट्विट करून गोपीनाथ मुंडे यांची आठवण जागवली आहे.

माझे गुरू विचारांनी माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्या नसण्याची कमी नेहमीच राहील. गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय वाटचाल करणे कठीणच असते. माझ्या गुरूंनी मला शिकवले “थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही”. तसं वागण्याचा प्रयत्न करत राहीन, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *