परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा

बीड
Spread the love

परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा
राजस्थानी पोदार लर्न स्कुलला यावर्षीपासुन निट [NEET] परिक्षा केंद्राची मान्यता

परळी _प्रतिनिधी_ परळी शहर व परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीतच उच्च दर्जाच्या शिक्षणामुळे केंद्रबिंदू ठरलेल्या राजस्थानी पोद्दार लर्न स्कुलला यावर्षीपासून नीट (NEET) परिक्षा केंद्राची मान्यता मिळाली आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे
जावे लागत होते. हे केंद्र आता परळी शहरात झाल्याने विद्यार्थ्यांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. दरम्यान (NEET) नीटच्या मान्यतेमुळे परळीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राजस्थानी पोदार लर्न स्कुल पोदार एज्युकेशन नेटवर्क, मुंबईच्या अंतर्गत चालवले जात असून, यापूर्वी स्कुलला सीबीएसई परिक्षा केंद्राची मान्यता मिळालेली आहे. पाठोपाठ आता वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दृष्टीकोनातून अत्यंत उपयुक्त असलेले नीट (NEET) परिक्षेचे केंद्र परळीतील राजस्थानीज पोदार लर्न स्कुलला मिळाले आहे….परळीच्या शिरपेचात मानाचा या परिक्षा केंद्रामुळे मराठवाडाभरातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. सदर परिक्षेचे केंद्र मिळाल्याबद्दल राजस्थानी पोदार लर्न स्कुल संचालक मंडळ व शिक्षक वर्गाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *