राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात औषध फवारणी

परळी वैजनाथ
Spread the love

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात औषध फवारणी

चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला शुभारंभ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग दहशतीखाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवतंय. नागरिकांना स्वच्छता पाळा, घराबाहेर पडू नका असे आवाहनही करण्यात येत आहे. शासनाच्या मदतीला अनेक समाजसेवी संस्था वेगवेगळ्या पद्धतीने पुढे येत आहेत. दै.मराठवाडा साथी जनजागृती अभियान अंतर्गत परळी शहरांमध्ये राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्यावतीने विविध प्रभागात औषध फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा शुभारंभ आज गुढीपाडवाच्या मुहूर्तावर करण्यात आला.
परळी शहरात गेल्या आठवडाभरापासून दै.मराठवाडा साथी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. कोरोनासारख्या महामारीपासून दूर राहण्याचे आवाहन नागरीकांना याद्वारे केले जात असून, प्रत्यक्ष उपाययोजनाही केल्या जात आहेत. बुधवारी शहरातील विविध भागात असलेले छोटे छोटे रस्ते रस्त्याच्या कडेला असणाऱ्यांना नाल्या व घरांचे कट्टे आदी ठिकाणी जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. ट्रॅक्टरवर बसवण्यात आलेल्या एक हजार लिटरच्या टाकीतून हे औषध फवारण्याचा उपक्रम चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी परळी नगर परिषदेचे स्वच्छता सभापती किशोर पारधे, जेष्ठ नेते अभयकुमार ठक्कर, राजेंद्र सोनी यांची उपस्थिती होती. पुढील अनेक दिवस जंतुनाशक औषध फवारणीचा हा उपक्रम परळी शहरात राबविण्यात येणार आहे.
शासनाने आवाहन केल्याप्रमाणे नागरीकांनी सोशल डिस्टंस्टींग म्हणजेच एकमेकांपासून अंतर पाळावे, स्वच्छता बाळगावी, वेळोवेळी हात धुवावेत, तोंडाला व नाकाला रूमाल किंवा मास्क बांधावेत, सर्दी ताप खोकला असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा याचबरोबर खाजगी डॉक्टरांनी त्यांच्या सेवा २४ तास नागरीकांसाठी सुरू ठेवाव्यात असेही आवाहन मराठवाडा साथी जनजागृती अभियान अंतर्गत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *