परळीत निराधार व्यक्तींना जेवण; एक दिलासा फाऊंडेशनचा उपक्रम

परळी वैजनाथ
Spread the love

परळीत निराधार व्यक्तींना जेवण; एक दिलासा फाऊंडेशनचा उपक्रम

परळी येथील एक दिलासा फाऊंडेशनतर्फे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्व हॉटेल, अन्नक्षेत्र बंद करण्यात आल्याने वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या निराधार व्यक्तींना सहारा देण्यासाठी रोज दोनवेळा पोटभर अन देण्यात येत आहे. येथील बारा ज्योतिलिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या पाण्यावर अनेक निराधार की, पुरुष बसलेले असतात. इतर वेळी वैद्यनाथ मंदिर व अन्नपूर्णा ट्रस्ट कडून अन्नदान करण्यात येते. या निराधारांची यामाध्यमातून व्यवस्था होत असते. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव यामुळे राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे वैद्यनाथ मंदिर व तेथील अत्रक्षेत्र तसेच याच परिसरातील अन्नपूर्णा ट्रस्ट चे अन्नक्षेत्र बंद करण्यात आल्याने या निराधारांची खाण्यापिण्याची परवड होऊ लागली. पण येथील एक दिलासा सामाजिक संस्थेच्या वतीने या निराधारांसाठी दिवसात दोन वेळेस जेवणाची व्यवस्था मागील आठ दिवसांपासून करण्यात येत आहे. व जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत यांची आम्ही जेवणाची व्यवस्था करणार असल्याचे या सामाजिक संस्थेच्या कार्यकत्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *