दोन घास भुकेल्या॓साठी ; जगुया थोडंसं माणुसकीसाठी

परळी वैजनाथ
Spread the love

#__________________________

*दोन घास भुकेल्या॓साठी* ;
जगुया थोडंसं माणुसकीसाठी*

आपल्याला एकांताची काळजी तर
अनेकांना खाण्याची चिंता

अण्णपूर्णा ट्रस्टचं शहरातील भिक्षुक व निराशश्रीतांसाठी ॑ पहिलं पाऊल

अखंडपणे दोन वेळचे मोफत जेवण ‌

परळी — शहरात करोना व्हायरसच्या पाश्र्वभूमीवर लाॅकडाऊन असल्यामुळे वैद्यनाथ मंदिर व परळी शहर परिसरात असलेल्या अनेक भिक्षुक निराश्रीत तसेच वंचित यांची उपासमार होवु नये म्हणुन त्यांची उपासमार थांबली पाहिजे या सामाजिक बांधिलकेतुन व आपणही समाजाच काही देणं लागतो या भावनेतून दोन वेळेचे जेवणाची व्यवस्था अखंडपणे चालू आहे .जो पंर्यत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत हि व्यवस्था चालुच राहील अशी माहिती अध्यक्ष अनिल लाहोटी तसेच सर्व पदाधिकारी यांनी दिली

.ज्यांना रोज कमावून रोज ख्याचे त्यांचेत या नवीन लॉक डाऊन मुळे अजुन अडचणीत भर पडली आहे .या लोकांचा चेहऱ्यावरील चिंता पाहून पोटात खड्डा पडत आहे पण याला काहीच उपाय नाही . आणि प्रशासनाने घेतलेले काही नियमांची गरज देखील आहे पण आत्ता आपली जवाबदारी अजुन वाढली आहे . आता लढाई पुन्हा जोमाने लढावी लागेल अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.ट्रस्ट द्वारे बाराही महीने मंदिर परिसरातील भिक्षुकना जेवण दिले जाते
परन्तु या कर्फ्यू मधे त्यांच्या सोबतच शहरातील बेघर लोकाना सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे

हे कार्य मा तहसीलदार साहेब व पोलिस निरीक्षक साहेबांच्या निरिक्षणात सुचारु पाने शुरू आहे. आपल्या परिसरात असे कुणी भिक्षुक व निराश्रीत बेघर लोक असल्यास आपणं ८९७५५७०५७० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले

*________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *