बेघरांना पोलिसांचा माणुसकीची साथ;जाग्यावर दिले अन्नपाणी

परळी वैजनाथ
Spread the love

बेघरांना पोलिसांचा माणुसकीची साथ
जाग्यावर दिले अन्नपाणी

परळी वै
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबध देशभर लाॕकडाऊन पुकारला आहे.संचारबंदी जमावबंदी अश्या विविध बंदोबस्त हातावर असतांना परळी पोलिसांनी माणसातला देवाचे दर्शन घडवले आहे.शहरात पेट्रोलिंग दरम्यान निदर्शनास येणाऱ्या बेघर नागरिकांना अन्न व पाण्याची बाॕटल देऊन भुक्याजलेल्यांना आधार दिला आहे.याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर फिरत असुन प्रचंड लाईक आणी अभिनंदन होतांना दिसत आहे.
बेघर आणी भिक्षेक-यांसाठी एकमेव सहारा असतो तो देऊळ,मंदीर,मज्जिद अश्या प्रार्थना स्थळावर त्यांच्या अन्नपाण्याची येणाऱ्या भाविक भक्तांकडून सोय होते परंतु कोरोना पार्श्वभूमीवर देऊळ मंदिर व मज्जिदी नागरिकांच्या दर्शनासाठी बंद असल्यामुळे यांच्या निवारा अन्नपाण्याची प्रचंड गैरसोय होऊन बेघर व्याकुळ आणी हाताश होऊन फिरतायत इतर सामाजिक संघटनेनेही असे सुत्य उपक्रम हाती घेतले आहेत.चोवीसतास कर्तव्यात राहुन ही माणुसकी जपणारा हा परळी पोलिसांचा व्हिडिओ प्रचंड कौतुकानं नागरिक पाहत आहेत या व्हिडिओ प्रचंड लाईक शेअर आणी अभिनंदन होत आहे.
येथील संभाजी नगर पोलिस ठाण्याचे रमेश सिरसाठ, गित्ते. निर्मळे. पवार या पोलिस कर्मचाऱ्यांनी जगासमोर सुंदर असा पाॕझिटिव मॕसेज दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *