लॉकडाऊन संदर्भातील महत्वपूर्ण माहिती जेव्हा ना. धनंजय मुंडे स्वतः शेअर करतात…

परळी वैजनाथ
Spread the love

*तुम्हाला अतिमहत्वाचे काम आहे किंवा जिल्ह्यात प्रवेश करायचा आहे का?*

*लॉकडाऊन संदर्भातील महत्वपूर्ण माहिती जेव्हा धनंजय मुंडे स्वतः शेअर करतात…*

परळी (दि. २६) : लॉकडाऊन दरम्यान कोणाला आरोग्यविषयक इमर्जन्सी असेल व त्यासाठी वाहतूक व्यवस्था हवी असेल, काही कारणास्तव जिल्हा हद्दीत प्रवेश हवा असेल किंवा तुम्ही अत्यावश्यक सेवा वाहतूक करणारे असाल व त्यासाठीचा वाहतूक पास हवा असेल किंवा काही अतिमहत्वाच्या कामासाठी तुम्हाला संचारबंदी दरम्यान बाहेर पडण्यासाठी परवानगी हवी असेल तर याबाबतची माहिती जिल्हा पोलिसांच्या मदतीने स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेअर केली आहे.

बीड जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नियंत्रणाखाली इमर्जन्सी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून, रुग्णवाहिका किंवा अन्य वाहतूक व्यवस्था हवी असल्यास बीड जिल्हा पोलिस कंट्रोल रूमला फोन करावा, त्यासाठी १००, १०९१, ०२४४२२२२६६६ व ०२४४२२२२३३३ या क्रमांकावर संपर्क करून ती सुविधा तात्काळ मिळवता येईल. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास पोलीस वाहनामार्फत रुग्णाला वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यात येतील.

जिल्हा हद्दीत प्रवेश करावयाचा असल्यास त्यासाठी पोलीस खात्यामार्फत एक माहिती अर्ज व्हाट्सअप्प वर पाठवला जाईल, प्रवेशाचे कारण योग्य असल्यास त्या माहितीआधारे जिल्हा हद्दीत प्रवेश करण्याची मुभा देण्यात येईल. त्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक खटकळ मो. ९९२१०७०६९० यांना संपर्क करावा.

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहतुकदारांनाही आता पास देण्यात येत आहेत, आपण कोणत्या प्रकारची सेवा देत आहोत याबद्दल जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देऊन हा पास मिळवता येईल.

तसेच कोणाला संचारबंदीच्या काळात अतिमहत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायचे असेल व पोलीस कारवाई टाळायची असेल तर त्यांना सुद्धा पोलीस इमर्जन्सी कर्फ्यु सेल कडून अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे; त्यासाठी त्यांनी १००, १०९१, ९९२१०७०६९०, ९४०५७९७३९४, ९७६३२५२५०६ या क्रमांकावर फोन करून पोलिसांची छापील परवानगी घेऊनच बाहेर पडावे असे आवाहनही जिल्हा पोलिसांच्या वतीने पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे सातत्याने प्रशासकीय यंत्रणेच्या संपर्कात असून प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीसह वेळोवेळी उपयुक्त माहितीही ते जिल्हावासीयांना देत आहेत. मुंडेंच्या ट्विटर अकाउंटला ४ लाख फॉलोवर्स असून त्यामध्ये बीड जिल्हा वासीयांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे ही शेअर केलेली माहिती उपयुक्त ठरते आहे.

अधिक माहितीसाठी खालील ट्विटर लिंकवर क्लिक करा :

https://twitter.com/dhananjay_munde/status/1243124743181488130?s=19

https://twitter.com/dhananjay_munde/status/1243120915807760384?s=19

https://twitter.com/dhananjay_munde/status/1243119171430305792?s=19

https://twitter.com/dhananjay_munde/status/1243118172183527427?s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *