आनंदाची बातमी: ऑक्सफर्डच्या लसीची लवकरच भारतात मानवी चाचणी, कोट्यवधी डोस तयार

देश-विदेश
Spread the love

आनंदाची बातमी: ऑक्सफर्डच्या लसीची लवकरच भारतात मानवी चाचणी, कोट्यवधी डोस तयार

[वृतसंस्था]

आनंदाची बातमी: ऑक्सफर्डच्या लसीची लवकरच भारतात मानवी चाचणी, कोट्यवधी डोस तयार
ऑक्सफर्डकडून करोना व्हायरसवरील लस विकसित करण्यात आली असून परवाना मिळाल्यानंतर लगेचच तिची भारतात मानवी चाचणी केली जाणार आहे. लस विकसित करणाऱ्या युकेमधील संशोधकांसोबत भागीदार असणाऱ्या भारतीय कंपनीकडून ही माहिती देण्यात आली आहे. ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीने वैद्यकीय चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद दिला आहे. या लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम झालेले नसून रोगप्रतिकारक शक्तीलाही चालना मिळत असल्याचं चाचणीत समोर आल्याटी माहिती द लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध जर्नलमध्ये देण्यात आली आहे.ही लस जेनर इन्स्टिट्यूटने बनवली असून करोनापासून दुहेरी संरक्षण प्रदान करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही लस शरीरात अँटीबॉडीड आणि किलर टी- सेल्स बनवण्यात मदत करु शकते.लसीमुळे काही हलके दुष्परिणाम जाणवले आहेत. पण पॅरासिटामोलच्या सहाय्याने ते कमी केले जाऊ शकतात.भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी महत्त्वाचं आहे. कारण या लसीसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने कोट्यवधींची गुंतवणूक केलीय.
आॕक्सफर्डच्या संशोधकांसोबत भागीदार असणारी जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती कंपनी सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, “चाचणीमध्ये लसीचे सकारात्मक निकाल आले असून आम्हाला याचा प्रचंड आनंद आहे”
“आम्ही लवकरच लसीची भारतात मानवी चाचणी केली जावी यासाठी लायसन्स मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोबतच लवकरच मोठ्या प्रमाणात लसनिर्मिती करण्यासही सुरुवात करु,” असं अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. संग्रहित अदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीचे कोट्यवधी डोस तयार आहेत.भारतात स्वदेशी विकसित COVAXIN लसनिर्मिती करण्यात आली असतानाच द लॅन्सेटचा लेख प्रसिद्ध झाला आहे. दिल्ली एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेटाच्या पहिल्या संचावर येण्यास संशोधकांना किमान तीन महिने लागतील.जगभरात एकूण १०० लस विकसित केल्या जात असून ऑक्सफर्डची लस त्यापैकी एक आहे.२३ एप्रिल रोजी त्याच्या मानवी चाचणीस सुरुवात करण्यात आली होती.याशिवाय एकूण सात जणांच्या लसीची वैद्यकीय चाचणी सुरु असून यामधील काहीजण चीन आणि अमेरिकेतील आहेत.ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचं यश आता फार महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *