पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कंटेनमेंट झोनमधील गावांमध्ये सॅनिटाइझर वाटप

बीड
Spread the love

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कंटेनमेंट झोनमधील गावांमध्ये सॅनिटाइझर वाटप

सामान्यांच्या हितासाठी पंकजाताई नेहमीच काम करणार – सतीश मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) माजी मंत्री, भाजपच्या जेष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील कंटेनमेंट झोनमधील गावांमध्ये भाजपच्या वतीने सॅनिटाइझरचे मोफत वाटप करण्यात आले. पंकजाताई या सामान्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या नेत्या आहेत असे सांगून कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिश मुंडे यांनी केले आहे.
पंकजाताई मुंडे यांचा आज रविवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. तालुका भाजपाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोनमधील गावांमध्ये सॅनिटाइझरचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोनाने ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर पाय पसरायला सुरुवात केली आहे. नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता काळजी घ्यावी असे सांगून सावधानता बाळगावी आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोनावर मात करावी असे आवाहन सतीश मुंडे यांनी केले. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी सत्ता असताना आणि सत्ता नसतानाही जनतेच्या हितासाठी काम केले आहे. घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी या उक्तीप्रमाणे त्यांचे मतदार संघातील नागरीकांकडे लक्ष असते. कोरोनाच्या परिस्थितीतही त्यांनी सामान्यांसाठी पुढाकार घेऊन काम केले आहे असे सांगून त्यांनी वाढदिवस साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिल्याचे सतीश मुंडे यांनी सांगितले.
आज भाजपच्या वतीने तालुक्यातील धर्मापुरी, इंजेगाव, जिरेवाडी,सिरसाळा, दैठणा गोवर्धन अंतर्गत इनाम तांडा आदी कंटेनमेंट झोनमधील गावांमध्ये सॅनिटाइझरचे मोफत वाटप करण्यात आले. गावोगावच्या भाजपा नेते आणि कार्यकर्ते यांनी नागरिकांना सॅनिटाइझरचे वाटप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *