जिल्ह्यातील कोणताही शेतकरी विमा सहभागापासुन वंचित राहू नये-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड
Spread the love

*जिल्ह्यातील कोणताही शेतकरी विमा सहभागापासुन वंचित राहू नये– जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

बीड, दि.२८::-जिल्ह्यातील कोणताही शेतकरी विमा सहभागापासुन वंचित राहू नये यासाठी पोर्टल वर विमा भरताना येत आहेत अशा संबंधित गावा संदर्भात येणाऱ्या अडचणी त्या तात्काळ निरसन व दुरुस्त्या करुन घेण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.

प्रधानमंत्री पिक विमा योजना बीड जिल्ह्यात खरीप हंगाम 2020 या हंगामासाठी दि. 17 रोजी पासुन राबविण्यात येत असून अंतीम तारीख 31 जुलै 2020 अशी आहे. यासाठी कमी कालावधी राहीलेला आहे व कोणताही शेतकरी पिक विमा योजने पासुन वंचित राहु नये यासाठी सदर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020-21 अंतर्गत संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदी नुसार शेतक-यांना बँक व आपले सरकार केंद्रा (सी.एस.सी) मार्फत विमा सहभाग नोंदवता येत आहे.

काही गावामध्ये सी.एस.सी केंद्रां मार्फत पोर्टलवर विमा भरतांना अडचण येत असल्यामुळे संबंधित खालील गावातील शेतक-यांनी त्यांचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँके मार्फत विमा प्रस्ताव स्विकारण्यात येवुन शासन निर्णया प्रमाणे विमा हप्ता विमा कंपनीस वेळेत हस्तांतरीत करण्यात येणार आहे

अ.क्रं. – तालुका – महसुल मंडळ /गावाचे नाव
1. आष्टी – धामनगाव – मोरेवाडी,वंजारवाडी
2. माजलगाव – किट्टी आडगाव – सुलतानपुर
3 माजलगाव – नित्रुड – शिंदेवाडी
4. माजलगाव– माजलगाव – चिंचगव्हाण
5.बीड – मांजरसुंवा – आनंदवाडी
6. बीड – नाळवंडी – पोखरी मैंदा
7.बीड – लिंबागणेश – पोखरी घाट
8. अंबाजोगाई – घाटनांदुर- अंवलवाडी
9. गेवराई – धोंडराई-सावरगाव ज.

तसेच जिल्हयातील शेतकरी विमा सहभाग नोंदवत असताना ज्या शेतक-यांचा 7/12 महाभुलेख पोर्टलवर संलग्न होत नाहीत अशा शेतक-यांसाठी सुद्धा अशा शेतक-यांचे ज्या बँकेत खाते आहे त्यां बँकेने विमा प्रस्ताव स्विकारावेत असे आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *