परळी तालुक्यात 3 ठिकाणचे कंटेन्मेट झोन शिथील तर नव्याने पाच कंटेन्मेट झोन घोषीत

बीड
Spread the love

परळी तालुक्यात 3 ठिकाणचे कंटेन्मेट झोन शिथील तर नव्याने पाच कंटेन्मेट झोन घोषीत

परळी शहरातील 2 तर तालुक्यातील एका ठिकाणचे कंटेन्मेट झोन शिथील तर नव्याने पाच कंटेन्मेट झोन नव्याने घोषीत करण्यात आले आहेत.असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविण धरमकर यांनी दिले आहेत.
परळी शहरात इंदिरा नगर व हबीबपुरा, परळी तालुक्यातील जिरेवाडी या ठिकाणी संबंधित परिसरातील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात आले आहे व या संबंधित परिसरातील परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.
तर परळी शहरात परमार कॉलनी, इरिगेशन कॉलनी , जुने रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर व भिम वाडी, या शहरी भागात या संबंधीत परिसरात आणि गावात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे.त्यामुळे तालुक्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात ३१ ऑगस्ट २०२० रोजी रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ (१) (३) लागू करण्यात आले आहेत.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *