ना.धनंजय मुंडे होमगार्डच्या प्रश्नावर गृहमंञ्याची लवकरच घेणार भेट

परळी वैजनाथ
Spread the love

*ना.धनंजय मुंडे होमगार्डच्या प्रश्नावर गृहमंञ्याची लवकरच घेणार भेट*

*परळी वै….*
राज्यभरातील हजारो होमगार्ड्सच्या रोजगारावर गृह विभागाने पुन्हा एकदा कु-हाड चालवली आहे. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर उदरनिर्वाह करणाऱ्या होमगार्डच्या पदरी बेरोजगारी येणार असल्याने आज राज्याचे सामाजिक न्यायमंञी धनंजय मुंडे यांना होमगार्ड संघटनेच्या वतिने निवेदन देण्यात आले.
लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांचे बळ अपुरे पडत असल्याने होमगारस कायम नियुक्ती देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता. विशेष म्हणजे या होमगार्डना कायमस्वरूपी काम मिळेल,याची तजवीज करण्यात आली होती.
पोलीस महासंचालक यांच्या प्रस्तावास जुलैमहिन्यात मंजुरी मिळाली होती. त्यामुळे राज्यासह नाशिक मधील होमगार्डसला रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र, यानिर्णयास सहा महिने उलटत नाही तोच गृह विभागाने निधीचे कारण पुढे करीत शुक्रवारी (दि. १०) होमगार्डला आपले काम थांबविण्याचे आदेश दिले. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा समादेशकांना याबाबत वायरलेस संदेश देऊन होमगार्ड्सची सेवा
तत्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले.
यामुळे राज्यभरातील होमगार्समध्ये खळबळ उडाली असुन त्वरित होमगार्डचे प्रश्न मार्गी लावावे म्हणून राज्याचे सामाजिक न्यायमंञी धनंजय मुंडे यांना होमगार्ड संघटनेच्या वतिने निवेदन देण्यात आले यानिवेदनावर
रतन उजगरे सुरेश बुध्दे विलास डापकर फुलचंद मुंडे अमरनाथ मुंडे व ईतर 200 होमगार्ड हजर होउन निवेदन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *