शेतकरी कंपनीच्या नावावर लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या निसर्ग संस्थेवर कडक कारवाई करा-उत्तमराव माने

बीड
Spread the love

शेतकरी कंपनीच्या नावावर लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या निसर्ग संस्थेवर कडक कारवाई करा-उत्तमराव माने

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा..

प्रतिनिधी (परळी)
निसर्ग सेवाभावी संस्था चनई तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या संस्थेस शेतकरी उत्पादन कंपन्या तयार करण्यासाठी नाबार्डने २०१५ पासून परवानगी दिली होती.
संस्था उभारण्यासाठी नाबार्डने लाखो रुपये निधी दिला होता.
मात्र संस्थेने कागदो पत्री बोगस रेकॉर्ड तयार करून लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे या कंपनीवर कायदेशीरपणे कार्यवाही कारवाई करा. अशा मागणी चे निवेदन जिल्हाधिकारी द्वारे मुख्यमंत्र्याकडे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने यांनी केली आहे.
शेतकरी उत्पादक कंपनी चे नोंदणी करण्यासाठी प्रति कंपनी तीस हजार रुपये कंपनीकडून घेतले होते व शेतकरी कंपन्यांकडून सुद्धा प्रति कंपनी तीस हजार रुपये बोगस घेतले गेले.
शेतकरी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून फसवून कोऱ्या कागदा वर सह्या घेतल्या गेल्या व लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला .
यासंदर्भात संस्थेचे अधिकारी वाघमारे यांना विचारले असता माझी काय तक्रार करायचे ते करा मी तुम्हाला बघून घेईन अशा पद्धतीची धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तक्रार देण्यात आली होती व त्यांनी यासंदर्भात अंबाजोगाई पोलीस स्टेशनला चौकशीचे आदेश देण्यात आले होते मात्र पोलिस अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात कसली चौकशी करण्यात आली नाही.
उलट पोलीस स्टेशन संस्थेची पाठराखण करत असल्याचा आरोप उत्तमराव माने यांनी केला आहे.
याप्रकरणी संबंधित निसर्ग संस्थेवर कायदेशीर कडक कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *