दलित मागासवर्गीयावर अन्याय अत्याचारा विरुध्द परळीत रिपाई (A)चे जोरदार निदर्शने

बीड
Spread the love

*दलित मागासवर्गीयावर अन्याय अत्याचारा विरुध्द परळीत रिपाई (A)चे जोरदार निदर्शने*

_खबरदार यापुढे दलित-बहुजनावर अन्याय अत्याचार कराल तर-भास्कर रोडे
_
परळी वै….
देशाचे सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशावरून आज बुधवार रोजी विविध मागण्यांसंदर्भात परळी तहसील कार्यालया समोर रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडियाच्या वतिने जोरदार निदर्शने करण्यात आले.राज्यात दलित-बहुजनावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण दररोज वाढत आहे.खबरदार यापुढे अन्याय अत्याचार कराल तर असा इशारा रिपाईचे राज्य सचिव भास्कर रोडे यांनी दिला आहे.
राज्याचे राज्य सचिव भास्कर रोडे यांच्या नेतृत्वाखाली परळी येथील तहसील कार्यालया समोर घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे विविध प्रश्नाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत देण्यात आले.या निवेदनात नमुद केले आहे की,
लोकडाउन काळातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात यावी कारण छोटे व्यापारी इतर त्यामुळे छोटे व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध होऊन आधार मिळेल.,नगर जिल्ह्यातील इमामपुर येथील अमित साळवे व त्यांचे कुटुंबीयावर शेतीच्या वादावरून झालेल्या हल्ल्याची आरोपीस कडक शासन करण्यात यावे.,लॉकडाऊन काळातील सर्व उद्योग व्यवसाय धंदे बंद असल्यामुळे त्याकाळातील वीज बिले माफ करण्यात यावी.,पानशेंद्र जिल्हा जालना येथील बोरुडे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कुटुंबाला संरक्षण व शासकीय मदत देण्यात यावी व प्रकरणे जलद गतीने कोर्टात चालविण्यात यावे.,महाआघाडी सरकारच्या काळात दलित मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय प्रकरणी थांबविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.,परळी शहर व परळी ग्रामीण परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत., परळी संभाजीनगर पोलीस स्टेशन यांनी गुटका धारक गाडी चालकावर कारवाई केली आहे गाडी मालक व गुटका पोहोच करणार होते त्यांच्यावर ती योग्य कार्यवाही करावी,जलालपूर गायराने सर्वे नंबर 30 कन्हेरवाडी चे पीक पंचनामे करण्यात यावे (गायरान धारक). अदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ (अ) इंडिया परळी वैजनाथ च्या वतीने तहसील कार्यालय समोर निवेदन दिल्यानंतर राज्य सचिव भास्कर रोडे ,देविदास वाघमारे तालुका अध्यक्ष, युवा तालुका सचिव सुधीर रोड, अमोल रोडे, कमलकर निलंगेकर, सोमनाथ रोडे,आकाश रोडे, पवन वाघमारे, तुकाराम रोडे, रतन रोडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *