संपादक गंमत भंडारी यांना मातृशोक

बीड
Spread the love

*संपादक गंमत भंडारी यांना मातृशोक*

बीड / प्रतिनिधी
येथील दै. पार्श्वभूमी चे संपादक गंमत भंडारी यांच्या मातोश्री राधाबाई नंदलाल भंडारी यांचे आज मंगळवार दि.१५ सप्टेंबर २०२० रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८७ वर्ष होते.
सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती राधाबाई भंडारे त्यांच्या पश्चात तीन मुले, सहा मुली असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार समयी बीड शहरासह जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. दै. पार्श्वभूमी चे संपादक गम्मतभाऊ भंडारी यांच्या परिवारावर कोसळलेल्या दुःखात मराठवाडा साथी पीसीएन न्युज परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *