मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभात पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते होणार शासकीय मुख्य ध्वजारोहण

बीड
Spread the love

*मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारंभात पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते होणार शासकीय मुख्य ध्वजारोहण*

*हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करणार*

*जिल्ह्यातील उपविभागीय मुख्यालये व तालुका मुख्यालयाचे ठिकाणी होणार ध्वजारोहण*

बीड, (जिमाका) दि.15:– मराठवाडा मुक्तीसंग्राम दिननिमित्त मुख्य शासकीय समारंभात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते शासकीय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम गुरुवार, दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे.

जिल्हास्तरावरील मुख्य शासकीय समारंभात पोलीस मुख्यालय बीड येथे ध्वजारोहण सकाळी 9 :00 वाजता पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते आयोजित करण्यात आले आहे.
तत्पूर्वी मराठवाडा मुक्ती संग्राम वर्धापनदिन प्रसंगी हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम सकाळी 8.15 वाजता स्मृतिस्तंभ, प्रियदर्शनी उद्यान, राजीव गांधी चौक, बीड येथे आयोजित केला आहे.

जिल्हास्तरावरील शासकीय मुख्य ध्वजारोहण समारंभास सर्व निमंत्रीत मान्यवरांनी जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान, बीड येथील सकाळी 08.45 वा.पूर्वी उपस्थित रहाण्यास कळविण्यात आले आहे.

या समारंभास मराठवाडा मुक्ती संग्राम सेनानी व स्वातंत्र सैनिक, जिल्हयातील माननीय खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्वातंत्रय सैनिक, नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थाचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, राजकीय पक्षांचे स्थानिक प्रमुख, दलित मित्र पुरस्कार व शासकीय पुरस्कार प्राप्त व्याक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि स्थानिक मान्यवर नागरीक, समाजसेवक, सैन्यदलाजील शौर्य चक्र व इतर पदक विजेते, माजी पदाधिकारी-अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सदयस्थितीत कोव्हीड 19 साथरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क लावणे, सॅनिटाईझरचा वापर करणे, मोठया प्रमाणात उत्सव साजरा करण्याचे टाळणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि साथ रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेवून शासन परिपत्रकामध्ये नमूद सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करण्यात येणार आहेत.

जिल्हा मुख्यालये, उपविभागीय मुख्यालये व तालुका मुख्यालयाचे ठिकाणा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी 17.सप्टेंबर 2020 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येणार नाही.
तसेच ज्या ठिकाणी उपविभागीय कार्यालय आहे त्या ठिकाणच्या तहसिल कार्यालयात वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही.

कोव्हीड -19 साथरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून शासन व स्थानिक प्रशासनाच्या दिलेल्या सर्व आदेश, सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व जबाबदारीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात यावा असे सूचित करण्यात आले आहे.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *