महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी प्रा.प्रविण फुटके यांची नियुक्ती

बीड
Spread the love

*महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी प्रा.प्रविण फुटके यांची नियुक्ती*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.१६ – महाराष्ट्र राज्यासह देशभरात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.यामध्ये परळी येथील प्रा.तथा पत्रकार प्रविण फुटके यांची मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

विविध सामाजिक,धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रा.प्रवीण फुटके यांची महाराष्ट्र तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडी उपसचिव पदी सर्वानुमते नेमणूक करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष खा.रामदासजी तडस,महासचिव भूषण कर्डिले, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे ,कोषाध्यक्ष गजानन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी असलेल्या पत्राद्वारे या नियुक्त्या करण्यात आल्या.
दरम्यान या नियुक्तीनंतर प्रा.प्रवीण फुटके यांच्यावर सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.संघटनेने दिलेली जवाबदारी पार पाडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्नशील राहील असे प्रा.फुटके म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *