आज दिवसभरात अॕन्टीजेन तपासणीत एकुण 22 पाॕझिटिव्ह

बीड
Spread the love

आज दिवसभरात अॕन्टीजेन तपासणीत एकुण 22 पाॕझिटिव्ह;मोहा-4,पोहनेर-1 तर कोवीड सेंटर येथे-17 कोरोना पाॕझिटिव्ह

परळी[PCN NEWS]
परळी तालुका आरोग्य विभागाच्या वतिने तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज परळी तालुक्यातील मोहा आणी पोहनेर गावातील व्यापारी,शेतकरी,कामगार व इतर नागरिकांची आज रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली.
मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रात 162 नागरिकांची रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 163 पैकी 4 कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.
पोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात 145 नागरिकांची रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 145 पैकी एक व्यक्ती कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आला आहे.
मोहा व पोहनेर येथे दिवसभरात 307 पैकी 5 व्यक्ती कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.
दरम्यान दररोज परळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह येथील कोवीड केअर सेंटर येथे 110 नागरिकांची अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 17 कोरोना पाॕझिटिव्ह आढुळन आले आहेत.आज दिवसभरात एकुण 417 पैकी 22 कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे व आरोग्य विभागाच्या डॉक्टर,नर्स अदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *